Bhosari : हॉटेल समोरील पार्किंगमधून दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज – हॉटेल समोरील पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना भोसरी येथे घडली.

शिवाजी भीमराव अडसूळ (वय 40, रा. बावधन रोड, वारजे, पुणे) यांनी बुधवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडसूळ यांनी आपली एमएच-16-बीयू-1180 ही 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी भोसरी आळंदी रस्त्यावरील हॉटेल साईराजच्या समोरील पार्किंगमध्ये 18 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस नाईक हिंगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.