Bhosari : भोसरी परिसरातील दहा तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – भोसरी येथील उड्डाणपूल परिसरात उघड्यावर दारू पिणारे, विक्रेते आणि जुगार खेळणा-या 10 जणांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ओपन बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर मदिरापान करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जात आहे. भोसरी पोलिसांनी सोमवारी (दि. 22) भोसरी उड्डाणपूलाखाली आणि परिसरात दारू विक्री करणाऱ्या, दारू पिणा-या व जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या दारू विक्रेत्यांवर मुंबई दारूबंदी अधिनियम क 65 (ई), सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 112/117 आणि जुगार खेळणा-यांवर महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम 12(अ ) प्रमाणे गुन्हे दाखल करत त्यांच्यावर खटले भरविण्यात आले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.