BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : भोसरीत मान्यवरांच्या हस्ते क्रीडापटूंचा गौरव

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या लांडेवाडी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव खिरीड, मारूती वाघमोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य प्रा. दादासाहेब पवार प्रा. किरण चौधरी, प्रा. अंजीव बिंदू आदी उपस्थित होते.

  • वार्षिक क्रीडा अहवाल शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी सादर केला. राष्ट्रीय पातळीवरील 11, राज्यस्तरावरील 27, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ, पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व अश्वमेध क्रीडा स्पर्धेमध्ये कामगिरी करणारे 23 खेळाडू तसेच 2010 ते 2018 या कालावधीत राज्य व राष्ट्रीय स्तर, आंतरविद्यापीठ, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर झळकणारे 356 खेळाडू व गुणवंत 17 विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय कॅडेट कोर्स मधील 4 विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत असलेल्या 14 माजी विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा. माधुरी लोंढे आणि डॉ. नेहा बोरसे यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दादासाहेब पवार यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

.