Bhosari : सायकल दुकानातील साहित्य फेकले रस्त्यावर; दोघांना अटक

Bicycle shop materials thrown on the street; Both arrested

एमपीसी न्यूज – सायकल दुकानातील सामान बाहेर टाकून दुकानदाराला शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 19 जून रोजी दुपारी रघुवीर सायकल मार्ट, दापोडी येथे घडली.

विलास काटे (वय 60), महेश विलास काटे (वय 40, दोघे रा. दापोडी गावठाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कालिदास विठोबा काटे (वय 58, रा. दापोडी गावठाण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दापोडी येथे एस टी रोडवर रघुवीर सायकल मार्ट हे सायकल दुकान आहे. या दुकानाचे फिर्यादी हे आरोपींना भाडे देतात. 19 जून रोजी दुपारी फिर्यादी दुकानात स्वच्छता करीत होते. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आले. त्यांनी दुकानातील साहित्य बाहेर टाकून देऊन फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

‘दुकानातील सामानाला हात लावायचा नाही. पुन्हा इथे आलास तर तुझ्याकडे बघून घेईन’ अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.