Bhosari : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री साडेसातच्या सुमारास जुना जकात नाका ते जाधववाडी रोडवर घडली.

अजित इंद्रजित गुजर (वय 62, रा. यमुनानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अमर अजित गुजर (वय 31) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 14 / डी जे 0186 या ट्रॅक्टरवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास अजित त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / जी डब्ल्यू 6267) वरून जुना जकात नाका ते जाधववाडी या रस्त्यावरून जात होते. ते वाघेश्वर कॉलनी येथे आले असता एम एच 14 / डी जे 0186 हा ट्रॅक्टर भरधाव वेगात आला. ट्रॅक्टरने अजित यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये अजित गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.