Bhosari: भाजपला मोठा धक्का; आझमभाईंच्या मुलाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांच्या मुलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र, भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी आज (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निहाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नेते मंगलदास बांदल, देवदत्त निकम, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख, माजी नगरसेवक पंडित गवळी आदी यावेळी उपस्थित होते.

  • शहरातील ताकदवान नेते आझमभाई पानसरे यांचा निहाल हा मुलगा आहे. आझमभाई अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पक्षाचे सलग दोनवेळा शहराध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. 2017च्या महापालिका निवडणुकीवेळी पानसरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते. परंतु, भाजपमध्ये जाऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला. तरी त्यांना कोणतेही पद देण्यात आले नाही. आता त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे पानसरे नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. आजअखेर पानसरे यांचे पुत्र निहाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच आझमभाई पानसरे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.