Bhosari: इंद्रायणीनगरमध्ये राज्य सरकार विरोधात भाजपचे आंदोलन

0

एमपीसी न्यूज – कोरोनाची परिस्थिती हातळण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभर ‘मेरा आंगण, मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’, आंदोलन केले. त्याअंतर्गत भोसरीतील प्रभाग क्रमांक आठ येथे आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. अनेकांनी काळे कपडे परिधान करुन, हाताला काळी पट्टी बांधून राज्य सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. भोसरी -इंद्रायणीनगर, गवळीमाथा चौक, भाजी मंडई, तिरुपती चौकात आंदोलन केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आंदोलन करण्यात आले.

भाजप पदाधिकारी योगेश लोंढे,  हनुमंत लांडगे, बाबुराव लोंढे, गीता महेन्द्रु,  शिवराज लांडगे,  निखिल काळकुटे,  अनिल सौदंडे,  राजेश चव्हाण, लकी नागटिळक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like