Bhosari : भोसरीत आजपासून रक्तदान शिबीर

एमपीसी न्यूज – सध्या कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील रक्तपेढ्याकडे मर्यादित रक्तसाठा उपलब्ध आहे. यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे. यासाठी भोसरीत आजपासून पैलवान अमरभाऊ फुगे युथ फाउंडेशन, जिजाऊ प्रतिष्ठान आणि मृत्युंजय ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण सध्य स्तिथीत रक्तास कोणताही पर्याय उपलब्ध नाही. रक्तदान केल्यामुळे किंवा रक्त संक्रमणमुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, असे तज्ञाचे मत आहे.

रक्तदान शिबीरामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच शिबीराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी होऊन न देण्याची काळजी घेतली जाणार आहे व ‘सोशल डिस्टन्सिंग’चे भान ठेवूनच हे रक्तदान शिबीर घेतले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

रक्तदान शिबिर 29 मार्च पर्यंत सुरू राहणार असून रक्तदान करण्यासाठी इच्छुक दात्यांनी भासरीतील कै. पै. धोंडिबा उर्फ गणपत फुगे क्रिडा संकुल ( विरंगुळा केंद्र ) दिघी रोड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.