Bhosari : पाचशे रुपयांच्या नकली सहा नोटा जप्त

एमपीसी न्यूज – दोघांकडून भोसरी पोलिसांनी पाचशे रुपयांच्या सहा नकली नोटा जप्त केल्या आहेत. तसेच त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आणखीन नकली नोटा मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून तपास सुरु आहे.  ही कारवाई सोमवारी (दि. 10) रोजी दापोडी येथे करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आरोपींनी दापोडी मधील एका फळ विक्रेत्याकडून 50 रुपयांची फळे विकत घेतली. त्यासाठी त्यांनी 500 रुपयांची नोट विक्रेत्याला दिली. ही नोट नकली असल्याचा संशय विक्रेत्याला आला. त्यामुळे त्याने तत्काळ भोसरी पोलिसांशी संपर्क केला. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांकडून पाचशे रुपयांच्या सहा अशा 3 हजार रुपयांच्या नोटा  जप्त केल्र्या. या नोटा नकली असल्याचे लक्षात येताच त्या दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. तसेच त्यांच्याकडून आणखीन नकली नोटा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.