Bhosari : फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यवसायिकाकडून वृद्धाची दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लॅटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकांनी वृद्धाकडून 10 लाख रुपये घेतले. सहा वर्षे उलटली तरी वृद्धाला त्यांच्या फ्लॅटचा ताबा दिला नाही. हा प्रकार भोसरी येथे घडला.

ज्ञानेश्वर गंगाराम हुलावळे (वय 66, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिगंबर ज्ञानदेव पाटील (रा. प्राधिकरण, निगडी), प्रसाद कृष्णा (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिगंबर आणि प्रसाद बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची चिखली येथे आराध्या डेव्हलपर्स ही बांधकाम साईट सुरू आहे. त्यामध्ये फ्लॅट घेण्यात गुंतवणूक केली तर भविष्यात फायदा होईल, असे आमिष दाखवून फिर्यादी ज्ञानेश्वर यांना फ्लॅट घेण्यास भाग पाडले. फ्लॅट घेण्यासाठी ज्ञानेश्वर यांनी जानेवारी 2013 मध्ये 10 लाख रुपये एवढी रक्कम चेकद्वारे आरोपींना दिली. मात्र आरोपींनी सहा वर्षे उलटली तरी फ्लॅटचा ताबा अथवा पैसे काहीही दिले नाही, याबाबत गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.