Bhosari : कंपनीतून 60 हजारांचे पितळी भाग चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीतून एका चोरट्याने 60 हजारांचे पितळी भाग चोरून नेले. हा प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. ही घटना ही घटना 29ऑगस्ट रोजी एमआयडीसी भोसरी येथे घडली.

बिनू एम. नायर (वय 40, रा. ओंकार अपार्टमेंट, पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास एका चोरट्याने कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. आतील 60 हजार रुपये किंमतीचे पितळी सात भाग चोरून नेले. चोरीचा प्रकार कंपनीच्या सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.