Bhosari : मेडिकल दुकानाचे शटर उचकटून औषधे लंपास

एमपीसी न्यूज – मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून रोख रक्कम आणि औषधे असा एकूण 32 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) सकाळी साडेआठच्या सुमारास दापोडी येथे उघडकीस आली.

बिपीन सतीश लुंकड (वय 44, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मधील 11 नंबर बस स्टॉप जवळ लुंकड हॉस्पिटल जवळ फिर्यादी बिपीन यांचे युनिटी ड्रग हाऊस नावाचे मेडिकल दुकान आहे. गुरुवारी (दि. 2) रात्री पावणेदहाच्या सुमारास बिपीन यांनी त्यांचे दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून औषधे, रोख रक्कम आणि पंचधातूची मूर्ती असा एकूण 32 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.