Bhosari : कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून 86 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी कंपनीत जॉब तयार करण्यासाठी ठेवलेले 86 हजार 500 रुपयांचे कॉपर आणि अॅल्युमिनियमचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 12) उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी (दि. 18) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल बाबुलाल शहा (वय 30, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेतीन ते पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन आरोपी तोंडाला रुमाल व मंकी कॅप बांधून आले. त्यांनी कंपनीच्या टॉयलेटवरून कंपनीच्या वरती चढून छताचा पत्रा उचकटला. त्यानंतर कंपनीत जॉब तयार करण्यासाठी ठेवलेले कॉपर आणि अॅल्युमिनियमचे 86 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.