Bhosari : घरफोडी करून एक लाखाचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून 1 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी साडेसात ते मंगळवारी (दि. 3) सकाळी अकराच्या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली.

सपना महानतय्या पुजारी (वय 50, रा. अभिजित हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपना यांचे घर सोमवारी (दि. 2) सकाळी साडेसात ते मंगळवारी (दि. 3) सकाळी अकरा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून अडीच तोळे वजनाचे 1 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.