Bhosari : भरधाव वेगातील बस गतिरोधकावर आदळल्याने प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेली बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे गतिरोधकावर आदळली. यामध्ये बसचे सीट तुटून लागल्याने प्रवासी जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री साडेआठच्या सुमारास गव्हाणेवस्ती भोसरी येथे घडली.

भरत सोनू चिखले (वय 55, रा. सोनाई, गाडेपट्टी रोड, साकोरे, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बस चालक नितीन भास्कर पाटील (वय 45, रा. गळवाडे बुद्रुक, ता. अंमळनेर, जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन राज्य परिवहन महामंडळामध्ये बस चालक म्हणून नोकरी करतो. ते रविवारी अंमळनेर-पुणे या बसवर कार्यरत होते. मंचर येथून भरत हे बसमध्ये पुण्याला येण्यासाठी बसले. बस गव्हाणे वस्ती भोसरी येथे आली असता चालक नितीन याच्या हलगर्जीपणामुळे गतिरोधकावरून बस जोरात आदळली. भरत बसलेल्या सीटच्या पुढच्या बाजूचे सीट तुटले आणि ते भरत यांना लागले. यामध्ये भरत यांच्या जबड्याला व हनुवटीला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Pimpri: शहरात तब्बल एक हजार अनधिकृत गतिरोधक!; केवळ 110 गतिरोधक उभारले पोलीस परवानगीने

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1