-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari Business News : अहो, ऐकलं का ! सूर्या इलेक्ट्रिकमध्ये मिळताहेत ‘ऑनलाईन’पेक्षाही स्वस्त वस्तू

भोसरी-आळंदी रोडवर 'सूर्या इलेक्ट्रिक' शोरुमचे दिमाखात उद्घाटन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘सूर्या इलेक्ट्रिक’ या दुकानाची नवीन शाखा भोसरी-आळंदी रोडवर सुरू झाली आहे. या भव्य शोरूमचे उदघाटन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. या शोरूममध्ये ऑनलाईनपेक्षाही स्वस्त दरात इलेक्ट्रिक वस्तू मिळतात. त्यामुळे भोसरी आणि परिसरातील ग्राहकांसाठी सुर्या इलेक्ट्रिक मध्ये शॉपिंग करणे ही पर्वणी ठरणार आहे.

चिंचवड, वाकड, चाकण, मंचर, नारायणगाव, शिरूर, धायरी, माणिकबाग येथील यशस्वी वाटचालीनंतर सूर्या इलेक्ट्रिकने नववे भव्य शोरूम भोसरी येथे सुरू केले आहे. 5 हजार 600 चौरस फूट एवढ्या भव्य जागेत हे शोरूम आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

शुक्रवारी (दि. 16) सकाळी दहा वाजता आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर हिराताई घुले, नगरसेविका नम्रता लोंढे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, चिखलीचे नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अजित गव्हाणे, योगेश लोंढे, कामगार नेते इरफान सय्यद, निर्मला गायकवाड, शोरुमचे संचालक रमेश चौधरी, भोसरी शाखेचे व्यवस्थापक सागर तांबे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर कुलदीप पाटिल आणि सुर्या इलेक्ट्रिकची संपूर्ण टीम उपस्थित होती.

सूर्या शोरुममध्ये मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव, लॅपटॉप, एलईडी, टीव्ही, एसी पासून सर्व प्रकारचे होम अप्लायन्सेस उपलब्ध आहेत. या शोरूममध्ये ऑनलाईनपेक्षा स्वस्त दरात उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 0 टक्के व्याजदराने फायनान्सची सुविधा, कॅश बॅक ऑफर सुद्धा उपलब्ध आहे.

या शोरूममध्ये सर्व प्रकारचे डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. भोसरीसह पिंपरी चिंचवड शहरातील चोखंदळ ग्राहकांनी या शोरूमला एकदा नक्की भेट द्यायला हवी. …✍️
पत्ता – ‘सूर्या इलेक्ट्रिक’ भोसरी-आळंदी रोड, एसबीआय बँकशेजारी, ओम हॉस्पिटल जवळ,/संपर्कः 9850522010 भोसरी – 4110039

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.