Bhosari Murder: भोसरी येथे भरदिवसा महिला व्यावसायिकेची गळा चिरून हत्या

एमपीसी न्यूज : भोसरी येथे भरदिवसा एका महिला व्यावसायिकेचा आज (मंगळवारी) गळा चिरून खून करण्यात आला आहे. हा प्रकार सकाळी दहाच्या सुमारास घडला.(Bhosari Murder) पूजा देवी प्रसाद (वय-31) असं हत्या झालेल्या महिला व्यवसायिकेचे नाव आहे.

पूजा ब्रिजकिशोर प्रसाद (वय 31, रा. लांडगे आळी, भोसरी. मूळ रा. नवादा. ता. जि. मुजफ्फरपूर, बिहार) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती ब्रिजकिशोर शिवचंद्र प्रसाद (वय 38) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पूजाचं ‘प्रगती कलेक्शन’ नावाचं दुकान असून मागील काही वर्षांपासून हे कुटुंब शहरात वास्तव्यास आहे. पूजा यांनी मंगळवारी सकाळी त्यांचे दुकान उघडले. दुकानात त्या साफसफाईचे काम करत होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्ती दुकानात आला.(Bhosari Murder) त्याने धारदार शस्त्राने पूजा यांच्या गळ्यावर वार केले. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाल्या. दरम्यान पूजा यांनी आरोपीसोबत झटापट केली. त्या दुकानाच्या बाहेर येत असताना जमिनीवर कोसळल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehugaon : …म्हणून मुलांना शेतकरी, सैनिक बनविण्याचे स्वप्न बाळगावे – ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे, परिमंडळ एकचे उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, प्रशांत अमृतकर तसेच वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. भोसरी पोलिसांसह गुन्हे शाखेला देखील तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.(Bhosari Murder) गुन्हा घडल्यानंतर आरोपी पळून गेला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.