Bhosari : आधुनिक संकल्पनांमुळे भोसरी परिसर होणार स्मार्ट सिटी – विजय फुगे

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षात अनेक स्मार्ट संकल्पना राबविल्या आहेत. या संकल्पनांमुळे भोसरी परिसराला स्मार्ट सिटीचे रूप मिळणार आहे. यातून सुरक्षित, स्वच्छ भोसरी होणार आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय फुगे यांनी व्यक्त केले.

विजय फुगे म्हणाले, निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षाचे व्हिजन सांगणारे आमदार म्हणून आमदार महेश लांडगे यांचा विधानसभेत नावलौकिक आहे. 2014 साली आमदार महेश लांडगे विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पुढील पाच वर्षांचे नियोजन केले. त्यातून ‘व्हिजन 20-20’ ही संकल्पना उदयास आली. याअंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आधुनिक आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय करण्यात आला. या आधुनिक संकल्पनांमुळे भोसरी आणि परिसराला स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळणार आहे.

भोसरी परिसरातील नागरिकांना कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. त्यावर निवारण करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामुळे मोशी कचरा डेपो येथे दररोज हजारो टन टाकला जाणाऱ्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्यासाठी नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मंजूर  झाली आहे.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी परिवर्तन हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाइनच्या माध्यमातून 24×7 नागरिकांची मदत केली जात आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 35 हजार नागरिकांच्या तक्रारींचे निवारण या परिवर्तन हेल्पलाइनच्या माध्यमातून केले आहे. इंद्रायणी नदी स्वच्छता प्रकल्प हाती घेतला असून नदीत जाणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार आहे, असेही फुगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.