Bhosari : मुलांना होस्टेलवर सोडण्याच्या बहाण्याने पळविली कार

एमपीसी न्यूज – मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असे सांगून कार घेतली. मात्र, ती कार परत न करता फसवणूक केली. हा प्रकार 17 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भोसरी येथे घडला.

सुधाकर कुंडलिक पोळकर (वय 40, रा. चिखली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर माने (वय 35) व गौरी माने (वय 30, रा. न-हे, आंबेगाव, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असा बहाणा करून फिर्यादी यांना त्यांची कार मागितली. त्यामुळे फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपी माने यांना कार दिली. मात्र आरोपी यांनी अपहार करण्याच्या उद्देशाने कार घेऊन गेले. ती कार परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.