Bhosari : कार आणि टेम्पोचा भीषण अपघात

एमपीसी न्यूज – उबर कार आणि मालवाहतूक करणारा टेम्पो यांची जोरदार धडक बसली. हा अपघात आज (दि. 30) पहाटे भोसरी एमआयडीसी चौकात पहाटे पाचच्या सुमारास झाला. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, एम एच12/ पी क्यू 1857 ही उबर कार पुणे विमानतळावरून पिंपरीकडे जात होती. कार भोसरी एमआयडीसी चौकात आली असता कारची आणि एका मालवाहतूक करणा-या टेम्पोची जोरदार धडक झाली. मालवाहतूक करणारा टेम्पो (एम एच12 / पि क्यू 8831) गुलटेकडी मार्केटमधून भाजीपाला घेऊन मोशीकडे जात होता.

या अपघातात कार रस्त्याच्या बाजूला गेली. तर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. टेम्पोतील भाजीपाला रस्त्यावर सर्वत्र सांडला गेला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.