Bhosari : ज्वलनशील पदार्थ टाकून कार जाळली; आठ लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. यामध्ये कार आणि त्यातील महत्वाची कागदपत्रे जळाल्याने आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी दोन ते रात्री दहा या कालावधीत लांडगेवस्ती, भोसरी येथे घडली.

प्रशांत सुखदेव बागडे (वय 27, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बागडे यांनी त्यांची ब्रिझा कार (एम एच 14 / एच जी 0707) लांडगे वस्ती येथील शुभम लांडगे यांच्या घराशेजारी मंगळवारी दुपारी दोन वाजता पार्क केली. दिवसभरात अज्ञातांनी बागडे यांच्या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून कार पेटवून दिली. कारमध्ये कारची आणि फिर्यादी यांची महत्वाची कागदपत्रे होती. या आगीत कारसह कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत. बागडे यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.