Bhosari : पार्क केलेल्या कारमधून रोख रक्कम व लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या कारची काच फोडून कारमधून (Bhosari) रोख रक्कम, लॅपटॉप, घड्याळ असा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार 23 मार्च रोजी भोसरी येथील जय गणेश साम्राज्य चौकात घडली आहे.

स्वप्निल बबन ढेरे (वय 32, रा.मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MNS : महाविकास आघाडीच्या आमदारांकडून हिंदू धर्मीयांनी अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे – अजय शिंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कार पार्क केली असताना कारची काच फोडून कारमधील 25 हजार रुपये व लॅपटॉप व 100 रुपयांचा चार्जर, 500 रुपयांचे घड्याळ असा (Bhosari) ऐवज चोरून नेला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.