Bhosari : मंदिरातील एक लाख रुपयांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – शाळेच्या आवारातील श्री स्वामी समर्थ मंदिरातील एक लाख रुपयांची रोकड, पाच हजार रुपये किमतीची दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान भोसरी येथे घडली.

याप्रकरणी यशवंत बाबासाहेब बाबर (वय 63, रा. जय गणेश साम्राज्य, स्पाईन रोड, मोशी)यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसरीत श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळा आहे. शाळेच्या तळमजल्यात श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. त्याच्या बाजूला बाबर यांचे कार्यालय आहे. गुरुवारी रात्री कार्यालय बंद होते. मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरातील एक लाखाची रोकड, पाच हजार रुपयांची दानपेटी आणि कार्यालयातील कागदपत्रे चोरुन नेली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.