BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : श्री स्वामी प्रकटदिन सोहळा उत्साहात

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – रांगोळ्यांच्या पायघड्या…फुलांची सजावट…टाळ-मृदुगांचा गजर…महिलांच्या फुगड्यांचा फेर…हाती  भगव्या पताका …स्वामी समर्थांच्या नामस्मरणात तल्लीन झालेले भाविक आणि नयनरम्य असा पालखी मिरवणूक सोहळा हे सारे चित्र दिघी रोड भोसरीच्या स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित श्री स्वामी प्रकटदिन सोहळ्याचे होते. पहाटेपासून नामस्मरण, अभिषेक स्वामीसुत विरचित प्रकटकांड वाचन, महारूद्र, अभिषेक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा उत्साहात पार पडली.

 

दरवर्षी श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या वतीने स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे वाटप केले जाते. तसेच श्रीं ची आरती करण्यात येते. ‘अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”या नामस्मरणाने पहाटेची सुरुवात होते. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या जातात. श्री. च्या आरतीसाठी स्वामी समर्थ सोसायटीतील नागरिक आणि स्थानिक नगरसेवक अजित गव्हाणे, सागर गवळी, अनुराधा गोफणे संजय उदावंत यांच्यासोबतच बांधकाम व्यावसायिक अरविंद सोलंकी आदी उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये परिसरातील अनेक भजनी मंडळ सहभागी झाले होते.
महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सोहळा शिस्तबध्द पध्दतीने पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ सोसायटीतील नागरिकांनी प्रय़त्न केला. श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा पार पाडण्यासाठी स्वामी समर्थ नगर सोसायटीतील सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण चटप, कमिटीचे अध्यक्ष विजय ताजणे, उपाध्यक्ष संतोष सोनवणे, सचिव योगेश पोटे, खजिनदार मारूती भुरकुंडे, कार्याध्यक्ष अशोक भगत, सल्लागार संदीप लोढे, विठ्ठल कदम यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.