Bhosari : कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून लाखोंची फसवणूक; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी येथील अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून दुसऱ्या कंपनीला ई- मेल करून सुमारे 14 लाख 59 हजार 602 रुपये खात्यावर पाठवण्यास सांगत कंपनीची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 18 ते 24 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घडली.

_MPC_DIR_MPU_II

रवी रघुनाथलाल गेरा (वय 50, रा. बाणेर, पुणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी इसमाने 18 ते 24 ऑक्टोबर 2019 या कालावधीत अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ई- मेल आयडी हॅक केला. त्याद्वारे मॅक स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ई- मेल केला. त्या मेल मधून आरोपीने पंजाब नॅशनल बँकेच्या एका खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार मॅक स्टील इंडिया कंपनीने देखील त्यावर 14 लाख 59 हजार 602 रुपये पाठवले. या सर्व पैशांचा अपहार करून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.