Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भोसरीत मुख्यमंत्र्यांची रॅली

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली होणार आहे. गुरुवारी (दि. 10) सायंकाळी पाच वाजता भोसरी परिसरात ही रॅली होणार आहे.

भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीची सुरुवात भोसरी चौकातून होईल. त्यानंतर दिघी रोड, सिद्धेश्वर स्कूल, आळंदी रोड, कै. अंकुशराव लांडगे सभागृह या मार्गावरून ही रॅली काढण्यात येणार आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचार दौ-यांना सुरुवात झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचारामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी येत असल्याने भोसरीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.