Bhosari : विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेकडे पाहून अश्‍लिल हावभाव करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

संदीप ज्ञानेश्‍वर इचके (रा. पोटे चाळ, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इचके हा गेल्या दोन महिन्यापासून फिर्यादी महिलेकडे पाहून अश्‍लिल हावभाव करीत होता. यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने इचके याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.