BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हा

1,083
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – दापोडी मधील पाणीटंचाई विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे नागरिकांसह आंदोलन केले. त्यावरून भर रस्त्यात बेकायदेशीर जमाव जमवून परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांसह अन्य 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, स्वाती काटे तसेच मंगेश काटे, संजय उपार, अल्ताफ शेख, पांडुरंग काची, शहीद कुरेशी आणि अन्य 25 ते 30 जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून फिर्याद देण्यात आली आहे.

दापोडी मधील पाणीपुरवठा मागील दीड वर्षांपासून विस्कळीत आहे. महापालिका प्रशासनाला याबाबत सांगून देखील जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे, असा आरोप करत त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांना सोबत घेऊन पुणे-मुंबई जुना महामार्गावर दापोडी येथे हांडे घेऊन आंदोलन केले. यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांसह अन्य 25 ते 30 जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3