Bhosari : नादुरुस्त बस भर रस्त्यात सोडून गेल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बस नादुरुस्त असताना देखील ती चालवली. त्यामुळे ती बस भर रस्त्यात बंद पडली. बंद पडलेली बस रस्त्यात सोडून गेलेल्या पीएमपीएमएल बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (दि. 24) दुपारी दीड ते बुधवार (दि. 25) दुपारी एक या कालावधीत फुगेवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये घडली.

_MPC_DIR_MPU_II

महेंद्र शंकर देवकाते (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस फौजदार डी डी गोंटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र पीएमपीएमएल मध्ये बस चालक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या ताब्यातील एम एच 14 / सी डब्ल्यू 1810 ही बस सुस्थितीत नसल्याचे माहिती असताना त्यांनी ती बस चालवली. त्यामुळे ती बस फुगेवाडी येथील ग्रेडसेपरेटरमध्ये मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास बंद पडली. बस बंद पडल्यानंतर चालक महेंद्र बस रस्त्यातच थांबवून निघून गेले. बस भर रस्त्यात उभी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याचा नागरिकांना नाहक त्रास झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.