Bhosari : नऊ महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलांनी साठवलेले पैसे आणि त्यावरील व्याज महिलांना परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

शोभावती राजपूत (रा. इंद्रायणीनगर भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सविता राजाराम बो-हाडे (वय 49, रा. इंद्रायणीनगर भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर 2009 ते 28 ऑक्टोबर 2014 या कालावधीत फिर्यादी सविता यांनी पाच वर्षाच्या कालावधीत 30 हजार रुपये व त्यावरील व्याज 11 हजार 500 आरोपी महिलेकडे साठवले. आरोपीने सविता यांना त्यांचे पैसे न देता फसवणूक केली.

तसेच कमल ज्ञानेश्वर घुले, पूजा पप्पू साठे, कुसुम नारायण जाधव, विद्यावती लक्ष्मण प्रसाद शर्मा, इंद्रावती रामगुण यादव, परिघा उत्तम अवताडे, निर्मला दिलीप कसबे, लीलावती मच्छिंद्रनाथ विश्वकर्मा या नऊ महिलांनी देखील आरोपी शोभावती या महिलेकडे पैसे साठवले. महिलांनी साठवलेले पैसे आणि त्यावरील व्याज महिलांना देण्याचे ठरले. मात्र, आरोपी महिलेने महिलांना त्यांचे पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.