Bhosari : बांधकामाच्या राडारोड्यापासून पेविंग ब्लॉक निर्मिती; आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

एमपीसी न्यूज – शहरात सुरू असलेल्या बांधकामामुळे बांधकामाचा राडारोडा साचला जातो. हा राडारोडा इतरत्र टाकल्याने शहराचे सौंदर्य बिघडते. यावर मार्ग काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी नवीन प्रकल्पाची योजना आखली. बांधकामाच्या राडारोड्यापासून पेविंग ब्लॉक निर्मिती केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच राडारोडा कमी होईल. असे मत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रदीप तापकीर यांनी व्यक्त केले.

प्रदीप तापकीर आणि अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 10) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपसोबत सक्रियपणे काम मारण्याचे त्यांनी ठरवले आहे.

प्रदीप तापकीर म्हणाले, “शहरात असलेले उद्योग आणि त्यात काम करणारे कामगार यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.भोसरी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी बांधकाम साईट सुरू आहेत. या बांधकाम साईटवरील राडारोडा काम झाल्यानंतर शहरात मोकळ्या जागांवर टाकला जातो. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. तसेच यामुळे विविध समस्या निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी नामी युक्ती काढली आहे.

_MPC_DIR_MPU_II

बांधकाम राडारोडा पासून पेविंग ब्लॉक निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेची मान्यता घेण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास शहरातील राडारोडा कमी होईल. तसेच ज्या ठिकाणी रस्ते नाहीत तिथे रस्ते, पदपथ बनवले जातील.

पेविंग ब्लॉकमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच राडारोडा देखील कमी होईल. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून जनहिताच्या नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत. पेविंग ब्लॉक निर्मितीचा प्रकल्प सुरू झाल्यास नागरिकांना फायदा होणार असल्याचेही तापकीर म्हणाले.

व्हिडिओ : –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.