Bhosari Crime : कोरोना काळात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणा-या तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरनाच्या काळात कोणतेही सण-उत्सव साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानाही भोसरी येथे सार्वजनिक रोडवर मंडप घालून रहदारीस अडथळा निर्माण करणा-या तिघांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संतोष भानुदास गव्हाणे (वय 44), संजय शिवाजी नरवडे (वय 35), निलेश शिवाजी नरवडे (वय 30, तिघे रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सुरेश नानासाहेब वाघमोडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कोरोना साथीच्या काळात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तसेच दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी रस्त्यावर संतोष अण्णा गव्हाणे सपोर्ट क्लब मार्फत मंडपाची उभारणी केली.

यामुळे नागरिकांच्या रहदारीसाठी अडथळा निर्माण झाला. तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना सीआरपीसी कलम 41 (अ) 1 नुसार नोटीस समजपत्र देऊन सोडून दिले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.