Bhosari Crime : बस प्रवासादरम्यान महिलेच्या हातातून 45 हजारांची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज – बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातील 45 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी सव्वापाच ते साडेपाच या कालावधीत बाबर पेट्रोल पंप ते मंकीकर हॉस्पिटल बस स्टॉप, भोसरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुरेखाज्ञानदेव बारबोले (वय 50, रा. अशोकनगर, लिंगाळी रोड, दौंड) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारबोले शनिवारी दुपारी सव्वापाच ते साडेपाच वाजताच्या कालावधीत भोसरी येथील बाबर पेट्रोल पंप ते मंकीकर हॉस्पिटल बस स्टॉप या दरम्यान बसमधून प्रवास करत होत्या. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बारबोले यांच्या हातातील तीन तोळे वजनाची 45 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1