Bhosari : तीन वर्षात कर्जाच्या तिप्पट व्याज घेणा-या खासगी सावकारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कर्ज घेतलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा अधिक रक्कम व्याजापोटी मागून खासगी सावकाराने कर्जदाराची कार आणि एक दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. हा प्रकार आळंदी रोड भोसरी येथे 2016 ते जून 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुनील धर्मा पवार (वय 37, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी निलेश प्रकाश मेहता (वय 34, रा. आळंदी रोड भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश यांनी सुनील याच्याकडून 2016 साली आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले. सुनील याने निलेश यांच्याकडून व्याजापोटी एकूण 27 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. कर्जाच्या रकमेच्या तीन पटींनी व्याजाची रक्कम जास्त असल्याने निलेश यांनी ती देण्यास नकार दिला.

त्यावरून सुनील याने निलेश यांची कार (एमएच 14 / ईए 8438) आणि एक दुचाकी (एमएच 14 / डीजे 0701) जबरदस्तीने काढून घेतली. याबाबत निलेश यांनी भोसरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. भोसरी पोलिसांनी सुनील यांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.