Bhosari : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा घरापासून तिच्या कॉलेजपर्यंत पाठलाग केला. तसेच तिला बोलण्यास भाग पाडले. याबाबत मुलीच्या घरच्यांनी तरुणाकडे जाब विचारला असता तरुणाने मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली.  पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत  त्याला  अटक केली आहे.

ही घटना जून 2019 ते मार्च 2020 या कालावधीत दापोडी आणि खडकी येथे घडली.

अमित उर्फ अक्षय विजय कुमार स्वामी (वय 23, रा. दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा आरोपीने घरापासून कॉलेजपर्यंत पाठलाग केला. तसेच तिला बोलण्यास भाग पाडले. याबाबत पीडित मुलीने घरच्यांना सांगितले. मुलीच्या घरच्यांनी आरोपी तरुणाला याचा जाब विचारला.

त्यावर तरुणाने पीडित मुलीच्या घरच्यांना शिवीगाळ करून मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.