Bhosari : पेट्रोलपंपावर 18 लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पेट्रोलपंपावर 18 लाख रुपयांची  (Bhosari ) अफरातफर केल्या प्रकरणी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अफरातफर 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 11 या दहा तासाच्या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील गावडे पेट्रोलपंपावर घडला आहे.

याप्रकरणी राम सदाशिव गावडे (वय 49, रा.आळंदी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. यावरून रचितकुमार राकेश पांडे (वय 27, रा.उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पेट्रोलपंपावर आरोपी हा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करत 24 सप्टेंबर रोजी केवळ दहा तासाच 18 लाख 30 हजार 490 रुपयांची अफरातफर केली.

Alandi : वाघजाई माता मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम; गणेशोत्सवासाठी जमा केलेल्या वर्गणीतून वाटले 100 हेल्मेट

अपहार झाल्याचे  लक्षात येताच फिर्यादी (Bhosari ) यांनी पोलिसांकडे धाव घेतली. एमआयीडीसी भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.