Bhosari : लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अक्षय बापूसाहेब पाटील (वय 25, रा. सानोळी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीच्या आहेत. ओळखीचा फायदा घेत आरोपीने तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर चक्रपाणी वसाहत, भोसरी, गोवा या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार जुलै 2018 ते जून 2019 या कालावधीत घडला. त्यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत लग्नाला नकार दिला. याबाबत तरुणीने गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.