Bhosari : चंदनाचे झाड चोरणा-या अज्ञातांवर गुन्हा; भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – दापोडी येथून सात इंच व्यास असलेले चंदनाचे झाड चोरट्याने कापून नेले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आला.

मनोज वसंत भिवसाने (वय 31, रा. करणवीर कॉलनी, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील सीएमई गॅस एजन्सीजवळ एक 7 इंच व्यस असलेले पाच हजार रुपये किमतीचे चदनांचे झाड होते. दरम्यान, अनोळखी चोरट्याने ते कशाचेतरी सहाय्याने कापून चोरून नेले.

शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. त्यानुसार मनोज यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.