Bhosari Crime : महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – चहाड्या का करतेस असे म्हणत एकाने महिलेवर कोयत्याने वार करून जखमी केले. पोलिसांनी वार करणाऱ्यास अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहा वाजता संजय गांधीनगर झोपडपट्टी, मोशी येथे घडली.

ईस्तियाक ईनामऊल खान (रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत इंदूबाई पाटील सावंत (वय 55) यांनी सोमवारी (दि. 16) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदूबाई आणि आरोपी खान हे शेजारी शेजारी राहतात. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खान याने इंदूबाई यांना ‘माझ्या चहाड्या का करतेस’ असे म्हणत उलट्या कोयत्याने हातावर, मांडीवर मारहाण केली. त्यानंतर कोयत्याच्या धारदार बाजूने डोक्यात मारून जखमी केले. पोलिसांनी खान याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.