Bhosari Crime :फर्नेस ऑइलची चोरी करून भेसळ करणाऱ्यास अटक; 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – फर्नेस ऑइलची चोरी करून त्यात भेसळ करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्यास पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून अटक केली. त्याच्याकडून 37 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सेक्टर नंबर सात, एमआयडीसी भोसरी येथे आज (बुधवारी, दि. 18) करण्यात आली.

संजय उर्फ बाबा अभिमान पवार (वय 40, रा. रामनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांना माहिती मिळाली कि, एमआयडीसी भोसरी मधील सेक्टर क्रमांक सात येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये फर्नेस ऑइल चोरी करून त्यात बेहस्ल करून ज्यादा दराने विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून संजय याला ताब्यात घेतले.

संजयकडून पोलिसांनी 30 लाखांचा एक ऑइल टँकर, 5 लाख 79 हजारांचे 19 हजार 300 लिटर फर्नेस ऑइल, 65 हजारांचा एक जनरेटर, 15 हजारांच्या दोन इलेक्ट्रिक मोटर, 8 हजारांचे दोन मोबाईल फोन, 6 हजार 500 रुपयांचे बॅरेल आणि 37 हजार रुपयांची रोकड असा एककून 37 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईच्या ठिकाणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक निरीक्षक अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, नितीन लोंढे, वैष्णवी गावडे, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, योगेश तिडके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.