Bhosari Crime : भोसरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई शनिवारी (दि. 17) सायंकाळी साडेसात वाजता करण्यात आली. कुणाल दशरथ लांडगे (वय 36, रा. कासारवाडी), अप्पाशा इरप्पा शिवशरण (वय 42, रा. शितोळेनगर, सांगवी), शंकर खंडू दूनघव (वय 49, रा. भोसरी), किशोर नामदेव बाबर (वय 52, रा. कासारवाडी), गणेश भीमराव घोडे (वय 38, रा. लांडेवाडी), देवराज धोंडीबा पाचंगे (वय 35, रा. भोसरी), मुरली भिवाजी उजगरे (वय 51, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस शिपाई सागर यशवंत भोसले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील हॉटेल सर्जाच्या मागील बाजूला असलेल्या कौलारू घरात आरोपी कुणाल तीनपत्ती जुगार क्लब चालवत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून 36 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व आरोपींना पोलिसांनी सीआरपीसी कलम 41 (अ) 1 नुसार नोटीस समजपत्र देऊन सोडून दिले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.