Bhosari Crime : भोसरीत भरदिवसा पाऊण लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – आळंदी रोड भोसरी येथे भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या कालावधीत ही घटना विनय हाईट्स या सोसायटीमध्ये घडली. चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

_MPC_DIR_MPU_II

विक्रम बाळासाहेब नेहे (वय 25, रा. विनय हाईट्स, आळंदी रोड, भोसरी. मूळ रा. अकोले) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहे विनय हाईट्स या इमारतीमध्ये राहतात. त्यांचे घर सोमवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी कुलूप काढून घरात प्रवेश केला. घरातून 73 हजारांचे 30.61 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी घरातील कपाटातून चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.