Bhosari Crime : क्रेडिटकार्ड द्वारे पेट्रोल पंपावर आठ लाखाचे स्वाईप

एमपीसी न्यूज – रोख 15 हजार आणि क्रेडिट कार्ड घेऊन कार्डद्वारे पेट्रोल पंपावर आणि दुकानात वेळोवेळी स्वाईप करून आठ लाख रुपये घेतले. हे पैसे परत देण्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ करून विश्वासघात केला. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी आणि पिंपळे सौदागर येथे घडली.

यशवंत उर्फ अमोल रामचंद्र ननावरे (वय 36, रा. नाशिक फाटा, कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रमोद अंबादास सोनवणे (वय 42, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनावणे यांचा विश्वास संपादन करून ननावरे याने त्यांचे क्रेडिट कार्ड आणि रोख 15 हजार रुपये घेतले. क्रेडिटकार्ड द्वारे ननावरे याने सोनावणे अँड टेलरिंग शॉप, कासारवाडी येथे आणि पिंपळे सौदागर येथील पेट्रोल पंपावर वेळोवेळी स्वाईप करून आठ लाख रुपये घेतले. हे पैसे मोबदल्यासह परत करण्याचे अमिष दाखवून पैसे देण्यास टाळाटाळ करून विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.