Bhosari : बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

111

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून घरातून 1 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 18) पहाटे तीनच्या सुमारास संत तुकाराम नगर भोसरी येथे घडली.

HB_POST_INPOST_R_A

प्रशांत बाजीराव देशमुख (वय 32, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांची आई घर बंद करुन गावी गेल्या होत्या. घरी कोणी नसल्याचा फायदा घरून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील दागिने व मौल्यवान साहित्य असा एकूण 1 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A3
%d bloggers like this: