Bhosari crime News : भोसरीत सव्वा लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – बंद असलेल्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन, असा एकूण 1 लाख 28 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 11) पहाटे एक ते चार वाजताच्या सुमारास पांडवनगर, भोसरी येथे घडली.

वामन भीमराव ठेंग (वय 52, रा. पांडवनगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी कोणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 1 हजार 500 रुपयांचे चांदीचे दागिने, 22 हजारांचे दोन मोबईल फोन असा एकूण 1 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.