Bhosari Crime News : तरुणीला रस्त्यात अडवून लगट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – कामावर जाणाऱ्या तरुणीला रस्त्यात अडवून तिच्याशी वारवांर लगट करणाऱ्या एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

अजय किसन पाखरे (वय 26, रा. मु. पो. वानखेड, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. 3) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी आपल्या मैत्रिणीसह कामावर चालली होती. त्यावेळी आरोपी पाखरे हा तिचा दुचाकीवरून पाठलाग करीत आला. पिडित तरुणीला रस्त्यात अडवून ‘थांब, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे म्हणत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

तरुणी कंपनीच्या गेटवर गेली असता तिथेही आरोपी पाखरे याने कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाच्या समोर तिच्याशी पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच यापूर्वीही आरोपी पाखरे याने तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करीत विनयभंग केला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment