Bhosari crime News : कंपनीतून अडीच लाखांचे साहित्य चोरणाऱ्या अभियंत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीतील दोन लाख 43 हजार रुपयांचे साहित्य आणि इतर महत्वाची कागदपत्र चोरून नेल्याप्रकरणी कंपनीत काम करत असलेल्या एका अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एमआयडीसी भोसरी येथील फिनिक्‍स मायक्रो सिस्टीम्स या कंपनीत 1 ऑक्‍टोबर रोजी घडली.

महादेव बिरादार (रा. पंढरपूर रोड, छदाचंद, ता. इंडी, जि. बिजापूर, कर्नाटक) असे चोरीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रशांत वसंतराव वाळूंज (वय 38, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 6) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरादार हा फिर्यादी प्रशांत वाळूंज यांच्या फिनिक्‍स मायक्रो सिस्टीम्स या कंपनीत फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करतो.

1 ऑक्‍टोबर रोजी फिर्यादी वाळूंज हे कंपनीत नसताना आरोपीने कंपनीतील दोन लाख 43 हजार 600 रुपयांचे साहित्य व इतर महत्वाची कागदपत्र चोरून नेली.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.