Bhosari Crime News : पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. 4) रात्री नाशिकफाटा येथे घडली.

संतोष कानू सारसकर (वय 40, रा. शिवाजी चौक, कासारवाडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद (वय 22, पूर्ण नाव माहिती नाही. रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हर्षद आणि जखमी संतोष यांच्यात पूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी हर्षद याने रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी संतोष यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून पळून गेला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.