Bhosari crime News : टपरीवरील कामगाराला धमकी दिल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – टपरीवरील कामगाराला धमकी दिल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघांनी मिळून मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी अडीच ते तीन या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

सौरभ पिसे, निखिल बांगर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दीपक उमाकांत पटणे (वय 25, रा. भोसरी. मूळ रा. बिदर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटणे यांच्या भावाची इंद्रायणीनगर भोसरी येथे स्वामी समर्थ शाळेजवळ टपरी आहे. त्या टपरीवर राजू म्हेत्रे हा तरुण काम करतो. आरोपींनी त्याला धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी पटणे त्यांचे मित्र बंटी जगदाळे, रमेश मुळे यांनी आरोपींना जाब विचारला.

त्यावरून आरोपी सौरभ याने पटणे यांच्या हातावर कोयत्याने मारून जखमी केले. त्यानंतर निखिल याने हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.