Bhosari Crime News : सोसायटीत कामासाठी आलेल्या मजुराकडून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये कामासाठी आलेल्या मजुराने सोसायटीमधील अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत विनयभंगासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 6 जानेवारी दुपारी पाच ते 8 जानेवारी दुपारी साडेचार आणि 9 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडला आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये कामासाठी येत होता. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना मोहन याने तिच्यासोबत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत भारतीय दंड विधान कलम 354 (अ), पॉक्सो कायदा कलम 7, 8, 11, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.